अवसरी परिसरात गारांचा तडाखा
पारगाव, ता. ९ : अवसरी बुद्रुक, धामणी, खडकवाडी व वाळुंजनगर या परिसरात आज (ता.९) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अर्धा तास गारांचा तडाखा बसला.
मुसळधार पाऊस पडल्याने उन्हाळी कांदा, गहू, टोमॅटो आदि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे निर्माण झाली आहे.
अवसरी बुद्रुक परिसरात रविवारी सकाळपासूनच उन्हाचा मोठा तडाखा जाणवत होता दुपारी साडेचार वाजल्यापासून वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह गारांचा अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस पडत होता. यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला तर काढणीला आलेला गहू भिजला आहे. कच्च्या कैऱ्या गळून पडल्याने आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे अवसरी बुद्रुक चे कल्याण हिंगे पाटील, धामणीचे माजी सरपंच सागर जाधव, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके, वाळुंजनगरचे जयेश वाळुंज यांनी सांगितले.
02371, 02372
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.