जारकरवाडीत बिबट्याकडून शेळीचा फडशा

जारकरवाडीत बिबट्याकडून शेळीचा फडशा

पारगाव, ता. १६ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी अशोक धानापुणे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना बुधवार (ता. १२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे जारकरवाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
धानापुणे यांच्या घराशेजारी जनावरांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये तीन शेळ्या व सात गाई बांधल्या होत्या. बुधवारी (ता. १२) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यामध्ये प्रवेश करून तीन शेळ्यावर हल्ला केला. त्यामध्ये एक शेळी मृत्यूमुखी पडली तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, शेतकरी अशोक धानापुणे सकाळी गोठ्यातील जनावरे बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तात्काळ वनविभागाला या घटनेची माहिती दिली. वनरक्षक साईमाला गिते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृत पावलेल्या शेळीचा पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com