अरुंद मोऱ्यांमुळे अपघाताचा धोका

अरुंद मोऱ्यांमुळे अपघाताचा धोका

पारगाव, ता. २५ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) ते मेंगडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. परंतु रस्त्यावरील पूर्वीच्या मोऱ्यांचे रुंदीकरण केले नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मोऱ्यांचे रुंदीकरण करून संरक्षण कठडे बसवावेत, अशी मागणी अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य अजित चव्हाण यांनी केली आहे.

मेंगडेवाडी रस्त्यावरील अवसरी बुद्रुक ते मुक्तादेवीची खिंड या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइड पट्यांचे कामी पूर्ण केले आहे. परंतु रस्त्यावरील पूर्वीच्या मोऱ्यांचे रुंदीकरण करण्यात न आल्यामुळे रात्रीच्या वेळी समोरील वाहनांच्या लाइटमुळे मोऱ्यांचा अंदाज न आल्यास अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मोऱ्यांचे रुंदीकरण करून संरक्षण कठडे बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

02448

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com