आंबेगावात एसटीवरून राष्ट्रवादी-शिवसेनेत श्रेयवाद

आंबेगावात एसटीवरून राष्ट्रवादी-शिवसेनेत श्रेयवाद

पारगाव, ता. १० : आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या पुर्वभागातून जात असलेल्या बेल्हे-जेजुरी-बारामती महामार्गावरून बुधवारपासून (ता. १०) सुरु झालेल्या नवीन नारायणगाव-बेल्हे-लोणी-पाबळ-शिक्रापूर मार्गे जेजुरी या एसटीचे आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावात ग्रामस्थांनी चालक-वाहक यांचे सत्कार करत जोरदार स्वागत केले. मात्र, एसटी आमच्याच प्रयत्नामुळे सुरु झाल्याचे सांगून श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागल्याचे पहावयास मिळाले.
नव्याने झालेल्या बेल्हे-जेजुरी मार्गामुळे आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या पुर्वभागातुन नागरिकांना जेजुरी व मोरगाव येथे जाण्यासाठी पूर्वीपेक्षा अंतर कमी झाले आहे. या मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी जेजुरी एसटी सुरु करावी, अशी नागरिकांची मागणी होती. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच एसटी सुरु झाल्याचे तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले; तर सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव व पांडुरंग जाधव यांच्या पाठपुराव्यातून व मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या प्रयत्नातून ही एसटी सेवा सुरु केल्याचे खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके, तालुका भाजपचे सरचिटणीस किरण वाळुंज यांनी सांगितले.
या श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागल्याचे पहावयास मिळाले. मात्र, एसटी सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या एसटीचे रोडेवाडी फाटा (पोंदेवाडी) येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करून चालक व वाहक यांचा सत्कार केला. यावेळी अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज, उद्योजक संदीप पोखरकर, विठ्ठल मखर, सतीश घोलप आदी उपस्थित होते. तर, खडकवाडी येथे चालक-वाहक यांचा सत्कार अनिल डोके, किरण वाळुंज, नाथा सुक्रे यांच्या हस्ते केला. यावेळी सरपंच कमल सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज, दिलीप डोके, दादाभाऊ वाळुंज, आदिनाथ सुक्रे, वसंत भागवत, दत्तु बाबूराव सुक्रे, अरुण डोके, बाळासाहेब धुमाळ, बबन देवजी वाळुंज, बाळकृष्ण डोके, अनिल शिंदे, सुरेश वाळुंज, बबन सुक्रे, बाळू पंचरास आदी उपस्थित होते.

एसटीचे वेळापत्रक
बोरी-जेजुरी-बारामती एसटी सकाळी ७ वाजता बोरी येथून सुटेल. ती बेल्हे येथे ७.१५, साकुरीत ७.२०, मंगरुळ पारगावला ७.३०, लोणी येथे ८, पाबळला ८.१५, शिक्रापुरात ९, तळेगाव ढमढेरे येथे ९.४, उरुळी कांचनला १०.३०, जेजुरीत ११.३०, मोरगाव येथे १२ व बारामतीला १२.३० पोहचेल. परत दुपारी १ वाजता बारामतीवरून सुटेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com