सहकारमहर्षी वळसे पाटील यांना पारगाव येथे अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारमहर्षी वळसे पाटील यांना पारगाव येथे अभिवादन
सहकारमहर्षी वळसे पाटील यांना पारगाव येथे अभिवादन

सहकारमहर्षी वळसे पाटील यांना पारगाव येथे अभिवादन

sakal_logo
By

पारगाव, ता. १३ : दत्तात्रेयनगर (पारगाव) ता.आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील सहकारमहर्षी दिवंगत माजी आमदार दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या स्मारकास २५ वा स्मृतीदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
येथील शरद सहकारी बँकेच्या शाखेतही स्मृतीदिन साजरा करण्यात आला. कारखानास्थळावर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे व संचालक मंडळ, अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

02512