मंचर बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार
मंचर बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार

मंचर बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार

sakal_logo
By

पारगाव, ता. १३ : मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंचर बाजार समितीवर संचालकांच्या एकूण १८ जागा पैकी १७ जागा जिंकल्या तर एका जागेवर देवदत्त निकम यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे बंडखोर विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांचा वळसे पाटील यांच्या हस्ते पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील अतिथिगृहात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णुकाका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक रामचंद्र गावडे, संदीप थोरात, सचिन पानसरे, वसंत भालेराव, गणेश वायाळ, रत्ना गाडे, मयूरी भोर, जयसिंग थोरात, नीलेश थोरात, संदीप चपटे, अरुण बांगर, लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, सुनील खानदेशी आदी उपस्थित होते.

देवदत्त निकम यांचाही सत्कार
बाजार समितीवर निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर संचालक देवदत्त निकम व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बाजार समितीच्या निवडणुकीनंतर समोरासमोर भेट झाली नव्हती. दोन दिवसांपूर्वी निकम वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व निर्वाचित संचालकांचा सत्कार वळसे पाटील यांनी केला होता. निकम हे भीमाशंकर कारखान्याचे संचालक आहेत. त्यामुळे संचालक मंडळाच्या सभेच्या निमित्ताने वळसे पाटील व ते एकत्र येणार होते. अपेक्षेप्रमाणे ते सभेला उपस्थित राहिले. या वेळी वळसे पाटील यांनी बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

निकम यांच्या भूमिकेकडे लक्ष
निवडून आल्यानंतर निकम हे यात्रा-लग्नसमारंभाला उपस्थित राहून वळसे पाटील यांचा उल्लेख करत त्यांच्या वतीने शुभेच्छा देत होते. यापुढील काळात ते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व हेवेदावे विसरून पुन्हा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करणार की ते आपले स्वतंत्र अस्तित्व जपणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.