मुरघास दुग्ध व्यवसायिकांसाठी वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरघास दुग्ध व्यवसायिकांसाठी वरदान
मुरघास दुग्ध व्यवसायिकांसाठी वरदान

मुरघास दुग्ध व्यवसायिकांसाठी वरदान

sakal_logo
By

पारगाव, ता. २९ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकरी पावसाळ्याच्या दिवसात उपलब्ध असलेला हिरवा चारा कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करून मुरघास बनवून साठवला जातो. यामुळे हिरव्या वैरणीतील पोषक घटकांचे जतन होते. वैरण टंचाईच्या काळात पर्याय म्हणून वापरता येतो. त्यामुळे दुष्काळी आदिवासी भागातील दुग्ध व्यवसायिकांसाठी मुरघास वरदान ठरत आहे. लोणी धामणी परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होत असून, मुरघास बनवण्याकडे त्यांचा कल वाढला आहे

दुधाळ जनावराला रोज हिरवा चारा, वाळलेली वैरण, पशुखाद्य, खनिजमिश्रण, जीवनसत्वे योग्य प्रमाणात देणे अत्यंत आवश्यक आहे. साधरणपणे उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, उष्णता यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्याकरिता त्यांना वर्षभर हिरवा चारा पुरविणे आवश्यक असते. दुभत्या जनावरांना हिरव्या वैरणीची अत्यंत आवश्यकता असते. परंतु संपूर्ण वर्षभर जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही. विशेष करून उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरवातीला हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवते.


बाजारात सध्या प्रती लिटर ३०० रुपये दराने तयार कल्चर मिळते. एक टन चाऱ्यासाठी एक लिटर कल्चर वापरले जाते. प्लास्टिक बॅगांची किंमत एक टन क्षमतेची ५०० ते ६०० रुपये, तीन टन क्षमतेची १४०० ते १५०० व पाच टन क्षमतेची १८०० ते १९०० रुपये किंमत आहे, असे बॅगांचे पारगाव येथील व्यापारी संदीप निकम यांनी सांगितले.

तरुणांकडून बॅगेत कुट्टी भरुण देण्याचा व्यवसाय
काही तरुणांनी ट्रक्टर व कुट्टी करण्याचे यंत्र घेतले आहे. शेतातील मका कापणी करून त्याची कुट्टी करून बॅगेत भरुण देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी प्रती टन १३०० रुपये घेतले जाते.असे खडकवाडी येथील व्यावसायिक अनिल सुक्रे यांनी सांगितले.

मूरघासासाठी सध्या प्लास्टिक ताडपत्रीच्या मोठ्या आकाराच्या पिशव्या वापरल्या जातात. त्याची साठवण क्षमता एक टनापासून पाच टनापर्यंत असते. वाळलेल्या चाऱ्यापेक्षा साठवणुकीस जागा कमी लागते.
- अमोल जाधव, दुग्ध व्यावसायिक, धामणी

मुरघासाच्या पौष्टिकतेमुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते. दुधाळ जनावरे भरपूर दूध देतात. मुरघासात तयार होणारे लॅक्टिक आम्ल हे गायी-म्हशींचे पचनेंद्रियात तयार होणाऱ्या रसासारखे असते म्हणून मुरघास पचण्यास सोपा असतो. मुरघासामुळे जनावराची भूक वाढते. ०वाळलेल्या चाऱ्याच्या पौष्टेकतेच्या तुलनेत मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते.
- डॉ. बाळकृष्ण घंगाळे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन

02563