गावडेवाडी रस्त्याची खड्डे पडल्याने दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावडेवाडी रस्त्याची खड्डे पडल्याने दुरवस्था
गावडेवाडी रस्त्याची खड्डे पडल्याने दुरवस्था

गावडेवाडी रस्त्याची खड्डे पडल्याने दुरवस्था

sakal_logo
By

पारगाव, ता. १ : आंबेगाव व खेड तालुक्याच्या पूर्वभागातील गावांना जोडणाऱ्या गावडेवाडी (ता. आंबेगाव) ते जऊळके (ता.खेड) रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडले आहे तर रस्त्यावरील खडी वर आली आहे. यामुळे त्रस्त वाहनचालकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावर गावडेवाडी ते वरची ठाकरवाडी रस्त्यातील घाटरस्त्याचे काही वर्षापूर्वी डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक वाढली होती. पेठ -अवसरी घाट व खेड घाटात तीन चार वर्षापूर्वी बायपास नसल्याने एकेरी वाहतूक सुरू असे. येथील अवघड वळणावर एखादा अपघात होऊन रस्त्यात वाहन अडकल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यावेळी वाहनचालक राजगुरुनगरहून वाफगाव मार्गे वरची ठाकरवाडी, गावडेवाडी पुढे मंचर किंवा पेठ पारगाव जउळकेमार्गे वरची ठाकरवाडी, गावडेवाडी या पर्यायी मार्गाचा वापर करीत असत. हा रस्ता सोयीचा आहे. मात्र, वरची ठाकरवाडी परिसरात काही वर्षापूर्वी असलेल्या खडी मशिनची खडी अवजड वाहनांमुळे रस्त्याची अनेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे.
वरची ठाकरवाडी ते जऊळके या दोन किलोमीटर रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. दोन चार चाकी वाहने किंवा साधी मोटारसायकल सुध्दा चालवता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या परिसराचे जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या निर्मला पानसरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


02573