मजूर, वाहने पुरवतो सांगून साडेचौदा लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मजूर, वाहने पुरवतो सांगून
साडेचौदा लाखांची फसवणूक
मजूर, वाहने पुरवतो सांगून साडेचौदा लाखांची फसवणूक

मजूर, वाहने पुरवतो सांगून साडेचौदा लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पारगाव, ता. १ : शेतातील ऊस तोडणीसाठी मजुर व ऊस वाहतुकीसाठी वाहने पुरवतो, असे सांगून मजूर व वाहनाचा पुरवठा न करता शेतकऱ्याची १४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भीमा एकनाथ पवार (रा. ओढरे, पो. शिंदी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याच्यावर पारगाव कारखाना (ता. आंबेगाव) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद सुरेश रोहिले यांनी दिली आहे. भीमा पवार याने कवठे येथील शेतकरी सुरेश रोहिले व त्यांचा भाऊ बाळू रोहिले यांच्या शेतातील ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी मजूर व वाहनाचा पुरवठा करतो, असा लेखी करार जून २०२२ मध्ये केला होता. तसेच, त्यांच्यात तोंडी बोलणे देखील झाले होते. करारनाम्यानुसार पवार यांनी शेतकरी रोहिले यांच्याकडून १४ लाख ४० हजार रुपये रक्कम घेतली होती. पैसे देऊनही पवार हे मजुर व वाहनांचा पुरवठा करत नव्हता. याबाबत त्याच्याकडे वारंवार विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. याबाबत आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच रोहिले यांनी तक्रार दाखल केली.