
खडकवाडी येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
पारगाव, ता. ८ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील जल जीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक लहानू धुमाळ, लक्ष्मण वाळूंज आणि ज्यांनी योजनेच्या विहिरीसाठी जागा उपलब्ध करून दिली ते गणेश धुमाळ यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी सरपंच अनिल डोके म्हणाले, उपसरपंच एकनाथ सुक्रे, माजी उपसरपंच किरण वाळुंज, गुलाब वाळुंज, दिलीप डोके सुमारे एक वर्षापासून विहिरीच्या जागेसाठी प्रयत्न करत होते. गणेश धुमाळ यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिल्याने यश आले. यासाठी बबन वाळुंज व गुलाब धुमाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी सरपंच कमल सुक्रे, सरस्वती धुमाळ, गुलाब वाळुंज, दिलीप डोके, वैभव सुक्रे, बबन वाळुंज, गुलाब धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, मच्छिंद्र धुमाळ, दगडू धुमाळ, भाऊसाहेब धुमाळ, नाथा धुमाळ, संदीप धुमाळ, अतुल धुमाळ, गणेश धुमाळ उपस्थित होते.
02600