ग्रामसेवकास मारहाणीचा जुन्नर संघटनेकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसेवकास मारहाणीचा
जुन्नर संघटनेकडून निषेध
ग्रामसेवकास मारहाणीचा जुन्नर संघटनेकडून निषेध

ग्रामसेवकास मारहाणीचा जुन्नर संघटनेकडून निषेध

sakal_logo
By

आपटाळे, ता. १४ : जुन्नर विकास गटातील ग्रामपंचायत मांडवे येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक पंडित सोपान केदारी यांना दारू पिऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या घटनेचा जुन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेने निषेध व्यक्त केला. संघटनेच्या वतीने १८ मे रोजी होणाऱ्या ग्रामसेवक आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामसेवक काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यासंदर्भातील निवेदन संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. १२) गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे कि, मांडवे येथील ग्रामस्थ विलास पुनाजी बुळे यांनी ग्रामसेवक केदारी यांना दारू पिऊन शिवीगाळ करत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेने ग्रामसेवकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे ग्रामसेवकांचे मानसिक खच्चीकरण होत असून, अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी सचिव विरेंद्र गवारी, मारुती दुराफे, रवींद्र खंदारे, रवींद्र जाधव, लहू आलिंगे, बबन दाभाडे, सरपंच ठमा कवटे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00884 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top