धामणखेल ग्रामपंचायतीने केल्या विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणखेल ग्रामपंचायतीने केल्या विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद
धामणखेल ग्रामपंचायतीने केल्या विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद

धामणखेल ग्रामपंचायतीने केल्या विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद

sakal_logo
By

आपटाळे, ता. ३ : विधवांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी जुन्नर तालुक्यातील धामणखेल ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील नागरिकांना यापुढील काळात विधवांना सन्मान देत अनिष्ट रूढी व परंपरा बंद करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती सरपंच संतोष जाधव यांनी दिली. नुकतीच ग्रामपंचायतीची मासिक सभा पार पडली या सभेत सर्व सदस्यांनी एकमताने ठराव करत महिलांना सन्मान मिळावा यासाठी आवाहन केले.
धामणखेल येथील महिला अस्मिता ग्रामसंघाच्या कार्यकर्त्या कांचन गुंजाळ व सीमा रघतवाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या धर्तीवर समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव करत ग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत मागणी केली. यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधत महिला अस्मिता ग्रामसंघाची मागणी एकमताने मंजूर केली.
ग्रामपंचायतच्या ३१ मे रोजी झालेल्या मासिक सभेत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार गावातील विधवा महिलांना सन्मानाने वागणूक देण्याचे व पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, बांगडया फोडणे, पायातील जोड्या काढणे यांसारख्या प्रथा बंद करण्याचे आवाहन केले आहे. या वेळी सरपंच संतोष जाधव, उपसरपंच देवराम कोंडे, सदस्य अभिषेक वर्पे, साधना कोंडे, पूजा मडके यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00889 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top