सततच्या पावसामुळे टोमॅटोला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सततच्या पावसामुळे टोमॅटोला फटका
सततच्या पावसामुळे टोमॅटोला फटका

सततच्या पावसामुळे टोमॅटोला फटका

sakal_logo
By

आपटाळे, ता १८ : जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पावसाचा टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला असून टोमॅटोचे गळीत कमी होणार असल्याने उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, अशी खंत धामणखेल येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी चैतन्यकुमार जाधव यांनी व्यक्त केली.
जुन्नर तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाळ्यापासूनच टोमॅटो पिकाला उच्चांकी बाजारभाव मिळाले होते. आजमितीस क्रेटला जवळपास १०० ते ४०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. मात्र गेले काही दिवस झालेल्या पावसाने मात्र टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकावर भुरी, डाऊनी, जीवणूजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर शेतात पाणी साचल्यामुळे पिकाच्या मुळ्या सडण्याचे प्रमाण वाढले आहे. या वातावरणामुळे पिकाची फुलगळ झाल्यामुळे फळधारणा होत नाही तर सततच्या पावसामुळे परागीभवन प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. या पिकाला पुन्हा नव्याने ट्रिटमेंट देण्याची गरज असून सुरुवातीला लावलेले जवळपास ५० हजार रुपयांचे भांडवलावर पावसाने पाणी फेरले असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली. दरम्यान, जाधव यांनी २७ गुंठे क्षेत्रात साडे चार हजार टोमॅटोच्या रोपांची लागवड केली आहे.

शेतकऱ्यांनी टोमॅटोसह इतर भाजीपाला यासाठी शेतात बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडर्माचे ड्रिंचिंग करावे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिला आहे.


01398

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00908 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top