आपटाळे येथे विविध उपक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपटाळे येथे विविध उपक्रमांचे आयोजन
आपटाळे येथे विविध उपक्रमांचे आयोजन

आपटाळे येथे विविध उपक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

आपटाळे, ता. ९ : येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासनाच्या वतीने राबविलेल्या ‘हर घर तिरंगा या अभियानात जुन्नर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थानी सहभागी व्हावे असे आवाहन तालुक्याचे सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी केले.
राष्ट्रध्वजाला समर्पित अशी विशेष संमेलने, चर्चासत्रे, शिबिरे या उपक्रमांचे आयोजन स्वयंस्फूर्तीने करावे. जुन्नर तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, नागरी सहकारी पतसंस्था, हौसिंग सोसायटी, मजूर संस्था यासह अन्य अशा ६१८ सहकारी संस्था कार्यरत आहेत.
या कालावधीत सर्व संस्था कार्यालयामध्ये आझादी का अमृत महोत्सवाचा लोगो लावावा, सर्व सहकारी संस्थांमध्ये स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज फडकविला जाईल याची काळजी घ्यावी, राष्ट्रध्वज विक्री व वितरण केंद्र म्हणून ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत कार्यालये, पोस्ट ऑफिस तसेच नागरी भागांमध्ये नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समितीचे कार्यालय या ठिकाणी विक्री करणेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00924 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..