पिकांचा शास्त्रीय अभ्यास करा : बुधवंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिकांचा शास्त्रीय अभ्यास करा : बुधवंत
पिकांचा शास्त्रीय अभ्यास करा : बुधवंत

पिकांचा शास्त्रीय अभ्यास करा : बुधवंत

sakal_logo
By

आपटाळे, ता. २२ : ‘‘शेतकऱ्यांनी हंगामानुसार पीक लागवड करत पिकांचा शास्त्रीय अभ्यास करत योग्य नियोजन केल्यास शेती व्यवसाय नफ्यात येण्यासाठी मदत होईल’’ असे प्रतिपादन जुन्नर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश बुधवंत यांनी केले.
श्री दत्त मंदिर, कुसूर (ता. जुन्नर) येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ग्रामपंचायत कुसूर व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी बुधवंत बोलत होते.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश ताजणे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, कृषिभूषण जितेंद्र बिडवई, विस्तार अधिकारी लक्ष्मण झांझे, सरपंच दत्तात्रेय ताजणे, उपसरपंच संदीप दुराफे, राजेंद्र भगत, महेंद्र ताजणे, सत्यवान ताजणे, अजित ताजणे, ग्रामसेवक प्रदीप खिलारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांनी पिकांना औषधांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या वेळी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षांची रोपे भेट देण्यात आली.

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00932 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..