शिवनेरीच्या रस्त्यावर राडारोड्यामुळे धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवनेरीच्या रस्त्यावर
राडारोड्यामुळे धोका
शिवनेरीच्या रस्त्यावर राडारोड्यामुळे धोका

शिवनेरीच्या रस्त्यावर राडारोड्यामुळे धोका

sakal_logo
By

आपटाळे, ता. १ : मुसळधार पावसामुळे किल्ले शिवनेरीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा व मोठ्या आकाराचे दगड-गोटे आल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. संबंधित विभागाने तातडीने हा राडारोडा हटवावा, अशी मागणी पाडळी बारवचे सरपंच संतोष केदारी यांसह पर्यटकांमधून केली जात आहे.
कुसूर व किल्ले शिवनेरीच्या परिसरात बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने किल्ले शिवनेरीवरील माती, राडारोडा, मोठ्या आकाराचे दगड गोटे दत्त मंदिर ते गडाच्या पायरीपर्यंत बनविण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर वाहून आले आहेत. हा राडारोडा न हटविल्यामुळे किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांमधून व स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00941 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..