पारुंडेत शेतीशाळांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारुंडेत शेतीशाळांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण
पारुंडेत शेतीशाळांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण

पारुंडेत शेतीशाळांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण

sakal_logo
By

आपटाळे, ता. ६ : पारूंडे (ता. जुन्नर) येथे जुन्नर तालुका कृषी विभागाच्या वतीने राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबिन आणि इतर गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत शेतीशाळा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी सोयाबीन पिकावरील कीड व रोगांचे नियंत्रण करणेबाबत नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ दत्तात्रेय गावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रेय जाधव व कृषी पर्यवेक्षक तान्हाजी देशमुख यांनी कृषी विभागाच्या अनुदानावरील योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी राजेंद्र पवार, मयूर पवार, भरत जाधव, प्रवीण पवार, अर्जुन पुंडे, नंदकिशोर पवार, निवृत्ती जाधव, खंडू जाधव, पोलिस पाटील श्‍याम पराड, कृषी सहायक गणेश धादवड यांसह शेतकरी उपस्थित होते.

01474

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00946 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..