आनंदाचा शिधा दिवाळी किट वाटप सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाचा शिधा दिवाळी किट वाटप सुरू
आनंदाचा शिधा दिवाळी किट वाटप सुरू

आनंदाचा शिधा दिवाळी किट वाटप सुरू

sakal_logo
By

आपटाळे, ता. २२ : जुन्नर तालुका महसूल विभागाच्या पुरवठा विभागाकडून दिवाळीच्या निमित्ताने लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिवाळी किट वाटप करण्यात आले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना किट वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी अंत्योदय व प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी चना डाळ, रवा, साखर व पामतेल प्रत्येकी एक किलोचे पॅकेट १०० रुपयांत उपलब्ध केले आहेत. जुन्नर तालुक्याच्या पुरवठा शाखेसाठी ६५ हजार किट प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील १६३ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून हे किट नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व दुकांनामध्ये किट उपलब्ध होणार असून पात्र लाभार्थ्यांनी आपले शिधापत्रिका ज्या स्वस्त धान्य दुकानाला जोडले आहेत त्या ठिकाणाहून किट घ्यावे असे आवाहन पुरवठा निरीक्षक रवींद्र दळवी व अव्वल कारकून गोपाळ ठाकरे यांनी केले.