कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले
कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले

कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले

sakal_logo
By

आपटाळे, ता ७ : यंदा पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावल्याने कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जुन्नर तालुक्यात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या लागवडी सुरू होतात. मात्र, अद्याप कांद्याची रोपे तयार करण्याची कामे सुरू असल्याने लागवड करण्यासाठी अजून काही दिवस शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे.
जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कांद्याच्या पिकावर अवलंबून असते. लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना कांद्याची रोपे तयार करावी लागतात. कांद्याचे बी टाकल्यानंतर एक महिन्यानंतर ते लागवडी योग्य होते. मात्र यंदाच्या वर्षी परतीच्या पावसात कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिपावसाने कांद्याची रोपे पिवळी पडणे, रोपे वाहून जाणे, तसेच उगवण क्षमता कमी होण्यासारखे परिणाम झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा रोपे तयार करण्याची वेळ आल्याने कांदा लागवडी अद्याप सुरू झाल्या नसल्याचे कुसूर येथील शेतकरी महेंद्र भगत यांनी सांगितले.
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने रोपांना झटका बसून रोपे पिवळी पडण्याची शक्यता आहे. या मुळे त्यांना प्रमाणात पाणी द्यावे. शक्यतो वाफसा परिस्थिती ठेवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी केले.


01565