राळेगण सोसायटीतील सभासदांना १५ टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राळेगण सोसायटीतील सभासदांना १५ टक्के लाभांश
राळेगण सोसायटीतील सभासदांना १५ टक्के लाभांश

राळेगण सोसायटीतील सभासदांना १५ टक्के लाभांश

sakal_logo
By

आपटाळे, ता. १३ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागामधील राळेगण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने सभासद शेतकऱ्यांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आला. हा लाभांश थेट सभासदांच्या बँकखात्यात जमा करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ संचालक सीताराम खिलारी व सचिव किरण भास्कर यांनी दिली. राळेगण सोसायटी अंतर्गत शिंदे, राळेगण व आपटाळे या तीन गावांतील ७३८ शेतकरी सभासद आहेत. तर ६२० कर्जदार सभासद आहेत. जिल्हा बँकेचे संचालक ॲड. संजय काळे व वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामात शेतकऱ्यांना ४ कोटींचे तर रब्बी हंगामात अडीच कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले असल्याचे अध्यक्ष राजू उंडे व उपाध्यक्ष रोहिदास कोल्हाळ यांनी सांगितले.