बोतार्डे येथे पंधरा वर्षानंतर सत्तांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोतार्डे येथे पंधरा वर्षानंतर सत्तांतर
बोतार्डे येथे पंधरा वर्षानंतर सत्तांतर

बोतार्डे येथे पंधरा वर्षानंतर सत्तांतर

sakal_logo
By

आपटाळे, ता २२ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोतार्डे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी हनुमान ग्रामविकास पॅनेलचा धुव्वा उडवल्याने ग्रामपंचायतीत पंधरा वर्षानंतर सत्तांतर घडले. परिवर्तन पॅनेलच्या वंदना संदीप डोळस यांची मोठ्या मताधिक्याने लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली.
बोतार्डे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच व ७ सदस्यांच्या जागांवर निवडणूक पार पडली. यामध्ये परिवर्तन पॅनेलचे सर्वच उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी हनुमान ग्रामविकास पॅनेलला एकही जागा राखता आली नाही.
नवनियुक्त सदस्य पुढीलप्रमाणे- जनार्दन मारुती मरभळ, संतोष किसन मरभळ, राहुल कैलास आमले, नलिनी सीताराम तलांडे, सुलोचना पोपट मरभळ, हिराबाई दादाभाऊ मरभळ, रंजना संतोष गांगड. परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व जनार्दन मरभळ, डॉ संदीप डोळस, समीर तलांडे, मच्छिंद्र आमले, संतोष आमले, विश्वास मरभळ, नवनाथ खरात, रोहिदास मरभळ, सुभाष मरभळ, विजय पोटे, किसन आमले यांनी केले. विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

12829