विठ्ठलवाडीच्या सरपंचपदी हरिश्चंद्र ढोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठलवाडीच्या सरपंचपदी हरिश्चंद्र ढोले
विठ्ठलवाडीच्या सरपंचपदी हरिश्चंद्र ढोले

विठ्ठलवाडीच्या सरपंचपदी हरिश्चंद्र ढोले

sakal_logo
By

आपटाळे, ता २२ : जुन्नर तालुक्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विठ्ठलवाडी ग्रामस्थ ग्रामविकास पॅनेलने विठ्ठल रखुमाई ग्रामविकास पॅनेलचा पराभव करत सर्वच जागांवर विजय पटकाविला. लोकनियुक्त सरपंचपदी हरिश्चंद्र अनाजी ढोले हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
विठ्ठलवाडी हे गाव पूर्वी येणेंरे गावंतर्गत समाविष्ट होते. मात्र २०१९ साली शासनाने विठ्ठलवाडीला नवीन ग्रामपंचायतीची मान्यता दिली. नव्यानेच स्थापन झालेल्या विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक होत असल्याने सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली.
विठ्ठलवाडी ग्रामस्थ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व सूर्यकांत ढोले, अरुण ढोले, विनोद देवकर, निखिल ढोले, वसंत ढोले, अमित ढोले, राहुल ढोले, केशव ढोले यांनी केले. ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
नवनियुक्त सदस्य : रवींद्र भालेकर, मंगल घोगरे, दीपाली घोगरे, रोहिणी केदार, दिलीप ढोले बिनविरोध, अक्षदा ढोले, हनुमान घोगरे.

01611, 01610