
जुन्नर खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध
आपटाळे, ता. ७ : जुन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी दिली. जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत १६ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. नवनियुक्त संचालकांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ॲड. संजय काळे, वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे, विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, व्यवस्थापक बाबाजी शिरसाठ यांनी अभिनंदन केले.
मतदार संघ व बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे- आदिवासी शेती पुरवठा सहकारी संस्था- रामदास विठोबा चतुर. जुन्नर गट- संतोष बन्सीधर सरजीने, राजेंद्र शंकर चव्हाण. नारायणगाव- शांताराम धोंडू गायकवाड, अविनाश भिकाजी भगत. आळे- लक्ष्मण धोंडिभाऊ घंगाळे, मंगेश शंकर खिलारी. ओतूर- किसन भीमाजी महाकाळ, जालिंदर दत्तात्रेय उकिर्डे. व्यक्ती सभासद- दीपक बाजीराव कोकणे, अरुण शिवाजीराव काळे. महिला प्रतिनिधी- भारती तान्हाजी घुले, मंगल नारायण गायकवाड. अनुसूचित जाती व जमाती- सुधीर तान्हाजी लाड. इतर मागास प्रवर्ग- शिवदास सावता विधाटे. भटक्या विमुक्त जाती व जमाती- संजीव वसंतपुरी गोसावी.