खानापूर निबंध, रंगभरण स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खानापूर निबंध, रंगभरण स्पर्धा
खानापूर निबंध, रंगभरण स्पर्धा

खानापूर निबंध, रंगभरण स्पर्धा

sakal_logo
By

आपटाळे, ता. २२ ः खानापूर (ता. जुन्नर) येथील शिवनेरी फाउंडेशनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवजन्म पाळणा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती प्रा. राजेंद्र मुरादे यांनी दिली.
शिवजयंतीचे औचित्य साधत ऊसतोड कामगारांना त्यांच्या फडावर जाऊन मिठाईचे वाटप फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत कणसे, अध्यक्षा डॉ. सरस्वती कणसे, सचिव शुभंकर कणसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा कणसे, प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर पटाडे, आयटीआयचे प्राचार्य राजेंद्र आंधळे, प्राचार्य संजय मिश्रा, फार्मसीचे प्राचार्य सचिन नागदेवे, आयटी विभागप्रमुख अमोल थोरात उपस्थित होते.