भात बियाण्याच्या उगवण क्षमतेचे अंजनावळे येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

भात बियाण्याच्या उगवण क्षमतेचे अंजनावळे येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

आपटाळे, ता. २० : अंजनावळे (ता.जुन्नर) येथे कृषी विभागाच्या वतीने भात बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेमध्ये भाताच्या स्थानिक बियाण्याची उगवण क्षमता घरीच तपासली जाते.
बियाण्यातून शंभर बिया घ्याव्यात, त्यानंतर ओले बारदान घेऊन त्यावर दहा बियाण्याचे एक ओळ याप्रमाणे दहा ओळी कराव्यात व बारदानाची गुंडाळी करून ठेवावी. त्यास पाच ते सहा दिवस पाणी शिंपडून ओले ठेवावे. सातव्या दिवशी बारदानाची गुंडाळी उघडून किती बियाण्यास चांगले कोंब आले आहे हे तपासावे, ऐशी पेक्षा जास्त कोंब आढळल्यास बियाणे पेरणीसाठी योग्य समजावे, अशी माहिती कृषी सहायक संध्या बोकड यांनी यावेळी दिली. यावेळी महालक्ष्मी महिला शेतकरी स्वयंसहायता बचत गटातील महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी दत्ता जाधव, कृषी अधिकारी बापू रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर मंडळ कार्यक्षेत्रात ही प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहे. या खरीप हंगामात पेरणी करताना सर्व शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून व बिजप्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहायक संध्या बोकड व शरद भोईर यांनी केले.

01729

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com