Sat, December 2, 2023

खानापूर येथील आयटीआयचा निकाल शंभर टक्के
खानापूर येथील आयटीआयचा निकाल शंभर टक्के
Published on : 3 September 2023, 9:27 am
आपटाळे, ता. ३ : खानापूर (ता. जुन्नर) येथील शिवनेरी आयटीआय संस्थेचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा वीजतंत्री विभागाचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र आंधळे यांनी दिली.
प्रथम वर्षाचा निकाल पुढील प्रमाणे : प्रणीत फलके ८५.८३ टक्के, निखिल बुचके ८३.८३ टक्के, गणेश थोरात ८३.६६ टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल पुढीलप्रमाणे सौरभ जाधव ८६.१० टक्के, रोहन बटवाल ८६.०० टक्के, आदित्य डोंगरे ८३.३३ टक्के. विद्यार्थ्यांना संतोष पाचपुते, जयदीप सैद यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे सचिव शुभंकर कणसे यांनी अभिनंदन केले.