वीज कोसळून गाईचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज कोसळून 
गाईचा मृत्यू
वीज कोसळून गाईचा मृत्यू

वीज कोसळून गाईचा मृत्यू

sakal_logo
By

बावडा, ता. ३ : खोरोची (ता. इंदापूर) येथे वीज कोसळून गाईचा मृत्यू झाला. खोरोची येथे विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस सुरु असताना गावाजवळ असलेल्या वस्तीवर वीज कोसळून संजय पांडुरंग वाघमोडे यांची जर्सी गाई जागेवरच मृत्यू पडली. त्यामुळे संजय वाघमोडे यांचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. या मृत्यूमुखी पडलेल्या गाईचा शहाजीनगर येथील पशुवैद्यकीय केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मरगळ, गाव कामगार तलाठी संदीप मैलागीर यांनी पंचनामा करून इंदापूर तहसील कार्यालयाकडे अहवाल पाठविला. दरम्यान, वैभव पाटील यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज पडून झाड आगीत भस्मसात झाले.

Web Title: Todays Latest District Marathi News Baw22b00593 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top