शहाजीनगर येथील रस्त्याचा वाद मिटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहाजीनगर येथील रस्त्याचा वाद मिटला
शहाजीनगर येथील रस्त्याचा वाद मिटला

शहाजीनगर येथील रस्त्याचा वाद मिटला

sakal_logo
By

बावडा, ता. ११ : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील शहाजीनगर-खाडे वस्ती-शेटफळ कॅनॉल या सर्व्हे नंबर रस्त्याबाबतचा सुमारे २५ वर्षांपासूनचा वाद सामोपचाराने मिटला. यामुळे हा रस्ता सर्वांसाठी खुला करण्यात आला. सुमारे १० फूट रुंदीचा तयार केल्याने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, दूधवाले आदींची जवळच्या मार्गाने चांगली सोय झाली आहे.
हा रस्ता बंद असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत होती. मात्र या परिसरातील १२ शेतकऱ्यांनी सर्वांच्या हितासाठी सहकार्य करीत सामंजस्याची भूमिका घेतल्याने रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते माणिकराव खाडे, संतोष जगताप, अनिल चव्हाण, एच.के.चव्हाण, सुनील पवळ, विजय खटके, संतोष पवळ आदी कार्यकर्त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. सामंजस्याची भूमिका श्रेष्ठ ठरत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

00476

Web Title: Todays Latest District Marathi News Baw22b00595 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..