''नीरा भीमा''चा बॉयलर अग्निप्रदिपन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''नीरा भीमा''चा बॉयलर अग्निप्रदिपन उत्साहात
''नीरा भीमा''चा बॉयलर अग्निप्रदिपन उत्साहात

''नीरा भीमा''चा बॉयलर अग्निप्रदिपन उत्साहात

sakal_logo
By

बावडा, ता. २७ : शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या २२ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि-प्रदिपन समारंभ कारखान्याचे संस्थापक व माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २६) उत्साही वातावरणात पार पडला.
आगामी गळीत हंगामामध्ये ८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, त्या दृष्टीने नियोजन केले आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सूसज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक मच्छिंद्र वीर व शालन वीर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. कार्यकारी संचालक राम पाटील, अधिकारी, हितचिंतक उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी सूत्रसंचालन सुधीर गेंगे-पाटील यांनी आभार मानले.

00489