महार रेजिमेंटचा ७५ वर्षानंतर वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महार रेजिमेंटचा ७५ वर्षानंतर वर्धापनदिन
महार रेजिमेंटचा ७५ वर्षानंतर वर्धापनदिन

महार रेजिमेंटचा ७५ वर्षानंतर वर्धापनदिन

sakal_logo
By

बावडा, ता. ९ : शूर महार रजिमेंटचा वर्धापन दिन महाराष्ट्रातील अनेक भागात उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने बावडा येथे महार रेजिमेंटचा ७५ वर्षानंतर पहिल्यांदा ८१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला.

रेजिमेंटच्या आजी -माजी सैनिकांनी महार रेजिमेंटचा ध्वज हाती घेऊन बावडा गावातून रॅली काढली.यात महिला, मुली तसेच शहीद झालेले जवान यांचे माता, पिता, पत्नी यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मेजर श्यामराव कांबळे यांच्या वतीने केले होते.
भारतीय लष्करातील महत्त्वाचे सैन्यदल अशी महार रेजिमेंटची ओळख आहे. या रेजिमेंटची १ ऑक्टोबर १९४१ मध्ये बेळगाव येथे स्थापना झाली. मेजर वॉडबी हा महार सैनिकांचा अधिकारी होता. त्यानंतर जनरल के. व्ही. कृष्णराव हे महार रजिमेंटचे पहिले जनरल होते. ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल देखील होते. दुसऱ्या महायुद्धात महार सैनिकांनी मोठी कामगिरी केली. रेजिमेंटच्या सैनिकांनी युद्धकाळात आणि शांती काळात आपल्या कर्तव्य दक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळविली आहे. यावेळी आपल्या भाषणात सुभेदार रामचंद्र व मेजर श्यामराव कांबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार रामचंद्र, व सुदाम सौदडे (हवलदार) प्राचार्य डी. आर. घोगरे, वैष्णवी खंडागळे होते. सामाजिक कार्यकर्ते भीमराव कांबळे यांच्या उपस्थितीत देशासाठी शहीद झालेल्या वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुभेदार रामचंद्र,यांचा सन्मान कँप्टन विजय लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
गायक विजय सरतापे यांचा भीमगितांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभेदार महादेव माने,सुभेदार तानाजी मोरे, मेजर गौतम वीर, मेजर बाळू खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

00492