
तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार नीरा भीमा कारखान्यास प्रदान
बावडा, ता. २३ : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (व्हीएसआय) गळीत हंगाम सन २०२१-२२ चा मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे व संचालक मंडळाने स्वीकारला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू-पाटील, मार्गदर्शक शिवाजीराव देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
नीरा-भीमा कारखान्यास आजपर्यंत राज्य व देशपातळीवरील एकूण १२ पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहिती यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रेय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबन देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील, अधिकारी उपस्थित होते.