''छत्रपती''स अडचणीत आणण्यास जबाबदार कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''छत्रपती''स अडचणीत आणण्यास जबाबदार कोण?
''छत्रपती''स अडचणीत आणण्यास जबाबदार कोण?

''छत्रपती''स अडचणीत आणण्यास जबाबदार कोण?

sakal_logo
By

बावडा, ता. १५ : ''''शेतकऱ्यांना चालु गळीत हंगामामध्ये बिले मिळण्यास थोडा विलंब झाला असला तरी लवकरच ती अदा केली
जातील. इंदापूरच्या आमदारांनी अध्यक्षपद सांभाळलेला छत्रपती साखर कारखान्याला अडचणीत आणण्यास जबाबदार कोण? याचे आत्मपरीक्षण करावे. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये आमदारांनी एखादी तरी सहकारी संस्था उभी करावी व मगच इतरांच्या सहकारी संस्थांवर आरोप करावेत.'''' असे प्रत्युत्तर नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी नुकतेच दिले.
आमदार दत्तात्रेय भरणे यांनी नीरा भीमा कारखान्यावर टीका केली होती, त्यास पवार यांनी प्रत्युत्तर दिले. पवार पुढे म्हणाले, कोणतीही सहकारी संस्था चालविताना तात्पुरता चढ-उतार येत असतो. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली नीरा भीमा कारखान्याने गेली २२ वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. ''नीरा भीमा''मुळे परिसराचा विकास झाला असून, हजारो संसार उभे राहिले आहेत. एखाद्या संस्थेवर टीका करणे अतिशय सोपे असते, मात्र ती संस्था उभी करण्यासाठी अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागतात.

नीरा भीमा कारखाना सध्या हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली मजबुतीने उभा असून, चालू २०२२-२३ च्या २२ व्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने आज अखेर पाच लाख ६० हजार टन ऊसाचे गाळप पूर्ण केले असून उपपदार्थ निर्मितीचे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, अशी माहितीही अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तात्रेय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार उपस्थित होते.

छत्रपती कारखाना हा राज्यातील जुना कारखाना असून जाचक, घोलप, चोपडे, निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या काळात राज्यात भरभराटीस आला होता. या कारखान्याचा आदर्श घेऊन राज्यात अनेक कारखाने उभे राहिले. असा हा आदर्श असलेला कारखाना मात्र माजी राज्यमंत्री हे कारखान्याचे अध्यक्ष झाल्यापासून अडचणीत आला आहे. सध्या माजी राज्यमंत्री कामकाज पाहत असलेला छत्रपती अडचणीत आल्याने, त्यांना इतर कारखान्यावर बोलण्याचा अधिकार नाही.
- लालासाहेब पवार, अध्यक्ष, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना