बावडा येथे संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा येथे संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
बावडा येथे संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

बावडा येथे संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

sakal_logo
By

बावडा, ता. १४ : बावडा (ता. इंदापूर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. १४) करण्यात आले.
यावेळी उदयसिंह पाटील म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यात महिलांचा सन्मान केला जात होता. चरित्र संपन्न, पराक्रमी, शूर, बुद्धिवान व अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले ते राजे होते. यावेळी विजय घोगरे, पवनराजे घोगरे, उपसरपंच नीलेश घोगरे, लक्ष्मण घोगरे, तुकाराम घोगरे, अभिजित घोगरे, ज्ञानदेव बागल, दादासाहेब कवडे, सचिन सावंत, अशोक मगर, ब्रम्हदेव कदम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक घोगरे, रणजित घोगरे, समीर मणेरी, परेश पारेख, अजिंक्य घोगरे, सचिन घोगरे, रणजित चव्हाण, अमर गायकवाड, सदाशिव कदम, धनंजय पवार, गणेश थोरपे, दर्शन गायकवाड, अनिल जाधव यांनी परिश्रम घेतले.