मराठा आरक्षणासाठीची वनवास यात्रा इंदापूर तालुक्यात आज होणार दाखल

मराठा आरक्षणासाठीची वनवास यात्रा इंदापूर तालुक्यात आज होणार दाखल

बावडा, ता. १४ : श्री क्षेत्र तुळजापूर येथून ता. ६ मे रोजी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईला निघालेली पायी वनवास यात्रा उद्या सोमवारी (ता. १५) सायंकाळी सरडेवाडी (ता. इंदापूर) येथे दाखल होणार आहे.या यात्रेस मराठा समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
वनवास यात्रा ही एकूण ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत मुंबईला ता. ६ जून रोजी छत्रपती महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिवशी पोचणार आहे.
इंदापूर तालुक्यातून ही यात्रा सोमवारी ता.१५ सरडेवाडी, ता. १६ - इंदापूर, गलांडवाडी नं.१, ता. १७ -लोणी देवकर, पळसदेव, ता. १८ - डाळज, भिगवण अशी प्रवास करीत दौंड तालुक्यात जाणार आहेत, अशी माहिती अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पवनराजे घोगरे, प्रवीण पवार सचिन जाधव, आश्रम फडतरे, मंगेश डोंगरे, बंडू ननावरे, महेंद्र काळे, आकाश देशमुख यांनी दिली.
वनवास यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संविधान आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कसे देता येईल, याबाबत जनजागृती करत ही यात्रा मार्गक्रमण करीत आहे. श्रीरामांना केवळ १४ वर्षेच वनवास भोगावा लागला, परंतु देश स्वतंत्र झाला तेंव्हापासून मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत वनवास सुरू आहे. तो वनवास मिटावा यासाठी आम्ही मराठा वनवास यात्रा काढली आहे. ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाही, असे यात्रेत सहभागी झालेल्यांनी सांगितले. यात्रेमध्ये प्रतापसिंह कांचन-पाटील, सुनील नागणे, तात्या महाराज लोमटे, राजेंद्र शिंदे, श्याम माळी, महेश केदार, रणजित भाकरे-चव्हाण, विशाल सावंत, जयराज वडने, प्रशांत नागमोडे, बाळासाहेब माने, अण्णा शिंदे, तानाजी शिंदे, नितीन लोमटे, अमर मुळे, रोहन गवळी हे सहभागी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com