
मुळशी तालुक्यात पावसाची प्रतीक्षा
भुकूम, ता. ६ : मुळशी तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भात लावणी रखडली आहे. शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे भात लावणीस वेग आला. मात्र, महिन्याच्या अखेरीपासून पावसाने उघडीप दिल्याने सध्या कडक ऊन पडत आहे.
तालुक्यातील शिवारातील, ओढे, नाल्यांचे पाणी कमी झाले. खाचरात लागवडीसाठी पाणी असल्यामुळे रोपांची खणणी, चिखलणी होऊ शकत नाही. डोंगर उताराचे क्षेत्र, आडव, वाड्या वस्त्या येथील खाचरांत पाणीच असल्यामुळे भात लावणी पूर्णपणे रखडली आहे. येथील भात लावणी होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.
दरम्यान, यावर्षी उशिरा पाऊस व पावसाची उघडीप यामुळे भात रोपांची उगवणी कमी झाली आहे. उघडिपीमुळे खणणी वेळेत होत नाही. त्यामुळे त्यांची उंची वाढत आहे. रोपे कमी प्रमाणात उगवल्यामुळे अनेक खाचरांत भात लागवड होऊ शकली नाही. त्यामुळे तालुक्यातील पंचवीस टक्के क्षेत्रात लागवड होणार नाही. त्यामुळे तांदूळ उत्पन्नात मोठी घट होण्याची
Web Title: Todays Latest District Marathi News Bhk22b00801 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..