भुकूमला आढळला लंपी बाधित बैल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुकूमला आढळला लंपी बाधित बैल
भुकूमला आढळला लंपी बाधित बैल

भुकूमला आढळला लंपी बाधित बैल

sakal_logo
By

भुकूम ता. ११ : येथे (ता. मुळशी) लंपी रोगाची बाधा झालेला बैल आढळला आहे. येथील शेतकरी संदीप माझीरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी बैलगाड्यासाठी कोल्हापूरवरून तो आणला होता, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल काळे यांनी दिली.
बैल आणल्यानंतर तो चारा पाणी काही घेत नव्हता. त्यामुळे माझीरे यांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधला. त्याची गुरुवारी (ता. ८) तपासणी करण्यात आली. रविवार सकाळी रिपोर्ट आल्यावर लंपी रोग झाल्याचे निदर्शनास आले, असे डॉ. काळे यांनी सांगितले. अधिक दक्षतेसाठी पाच किलोमीटर परिसरातील गावांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. भुकूम गावाच्या सर्व वाड्या, पिरंगुट, लवळे, मुकाईवाडी परिसरात लसीकरण करण्यात येईल, शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhk22b00826 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..