‘आदिवासींच्या घरकुलासांठी ‘सीएसआर’मधून निधी मिळविणार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आदिवासींच्या घरकुलासांठी 
‘सीएसआर’मधून निधी मिळविणार’
‘आदिवासींच्या घरकुलासांठी ‘सीएसआर’मधून निधी मिळविणार’

‘आदिवासींच्या घरकुलासांठी ‘सीएसआर’मधून निधी मिळविणार’

sakal_logo
By

भुकूम, ता. १८ ः आदिवासी कुटुंबांना घरकुलासाठी मिळालेला निधी पुरेसा नाही. चांगली घरे बांधण्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) फंडातून रक्कम मिळविणार असल्याचे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी सांगितले. आंदगाव (ता. मुळशी) येथे आदिवासींसाठी मंजूर झालेल्या बारा घरकुलांचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

येथे कातकरी आदिवासींची ३० कुटुंबे राहतात. त्यांच्या जागेचा प्रश्न वनखात्याकडे अनेक वर्षे प्रलंबित होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे तो मार्गी लागल्याचे कोंढरे यांनी नमूद केले. दरम्यान, सरकारकडून एका घरकुलासाठी एक लाख तीस हजार रुपये मिळतात. त्या रक्कमेत घरकुल पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील कंपन्यांचा सीएसआर निधी घरकुलांसाठी मिळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी साखर कारखान्याचे संचालक अंकुश उभे, सरपंच प्रफ्फुल्ल मारणे, उपसरपंच शिवाजी झुंझुरके, सदस्या कमल वाघमारे, विठ्ठल गुजर, बापू गुजर, ग्रामसेविका स्वाती गोसावी उपस्थित होते.
---------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Bhk22b00835 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..