Sun, Feb 5, 2023

मुळशी तालुक्यात
वर्दळ थंडावली
मुळशी तालुक्यात वर्दळ थंडावली
Published on : 13 December 2022, 12:09 pm
भुकूम, ता. १३ : ‘बंद’मुळे मुळशी तालुक्यातील वर्दळ थंडावली होती. भुकूम, भूगाव परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील पश्चिम भागातील हॉटेल सुरू होती, पण ग्राहक नव्हते. भुकूम परिसरातील सर्व व्यवसाय बंद होते. पुणे शहाराकडून येणारी वाहतूक पूर्ण बंद झाली होती. त्यामुळे मुळशीतील वर्दळ दिवसभर पूर्ण थंडावली होती.