Mon, Feb 6, 2023

कातरखडक येथे १७५
जणांची नेत्र तपासणी
कातरखडक येथे १७५ जणांची नेत्र तपासणी
Published on : 15 December 2022, 8:46 am
भुकूम, ता. १५ : कातरखडक (ता. मुळशी) येथे गोसावीबाबा भंडारा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये १७५ जणांची तपासणी करण्यात आली. सप्ताहाचे बत्तीसावे वर्ष होते. यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले. सात दिवस कीर्तन, भजन, प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दत्तात्रेय मालपोटे, संभाजी मालपोटे, योगेश पापळ, मेडिकल फौंडेशनचे डॉ. प्रणेश मोघे, विजया भामरे आदी उपस्थित होते.