आंदगाव येथे गव्याचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदगाव येथे गव्याचे दर्शन
आंदगाव येथे गव्याचे दर्शन

आंदगाव येथे गव्याचे दर्शन

sakal_logo
By

भुकूम, ता. २५ ः आंदगाव (ता. मुळशी) येथे शिवारात ग्रामस्थांना गवा दिसला आहे. तसेच तो वस्त्या, वाड्यांजवळ फिरत असतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच प्रफ्फुल मारणे यांनी वनविभागाकडे केली आहे.
याबाबत नागेश मारणे व मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी गवा येथील परिटवाडाकडून टेकडीवर वसलेल्या शिंदेवाडीकडे गवा जाताना पाहिला. मुठा खोरेत यापूर्वी गवा आला होता. दरम्यान एकच गवा आहे की कळप ते अद्याप माहीत नाही. मुठा खोरेला कोकण भाग जवळ आहे. त्यामुळे गवा त्यामार्गे आला असावा असा अंदाज विठ्ठल गुजर यांनी व्यक्त केला. दरम्यान आंदगावला गुजरवाडी, गणेशवाडी, शिंदेवाडी, लोहारवाडी, आटाळवाडी टेकड्यांवर वसलेली आहेत. तसेच गावठाण व काही शेतकऱ्यांनी रानात घरे बांधलेली आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ गव्याच्या आगमनाने भयभीत झाले आहेत.