
मुठा खोरेत मोटार चोरीचे प्रमाण वाढले
भुकूम, ता. २७ : मुठा खोरेत शेतकऱ्यांच्या पाणी उपसा सिंचन योजनेच्या मोटार चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यात मोठा अडथळा येत आहे. पोलिसांनी शोध घेऊन चोरांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
याबात राहुल मारणे (सिद्धेश्वर) अनिल दगडे (वातुंडे), सतीश मारणे (खारवडे) यांनी सांगितले, ‘‘शेतात असलेले बोअर, नदीच्या पाण्यावरील आमच्या मोटारी चोरीस गेल्या. दरम्यान चोर लांबचे नसून खोरेतीलच असावे असा संशय त्यांनी व्यक्त केला. या भागात आंब्याची मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड झाली आहे. तसेच उन्हाळी भाजीपाला शेतकऱ्यांनी केला आहे. साखर कारखान्याकडून अद्याप ऊस तोडणी झाली नाही, त्यामुळे पाणी द्यावे लागते. मोटारी चोरी गेल्यामुळे पीके व फळबागांना धोका निर्माण झाला आहे. तसेच नवीन मोटीरींच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून शेतकऱ्यांना परवडत नाहीत. चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.