Tue, May 30, 2023

मुळशीत पिकांना ढगाळ हवामानाचा धोका
मुळशीत पिकांना ढगाळ हवामानाचा धोका
Published on : 13 March 2023, 9:34 am
भुकूम, ता. १३ : मुळशी तालुक्यात सध्या ढगाळ हवामान पसरले आहे. त्यामुळे काढणीस आलेली पिके, फळबागा तसेच मोहोर आलेल्या आंब्यांच्या झाडांना धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात दिवसा ढगाळ हवामान, कधी कडक उनं असे वातावरण असते. त्यामुळे कांदा, ज्वारी, गहू पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मसूर, हरभरा, वाटणा काढणीस आलेले आहेत. आंब्याच्या झाडांना डिसेंबर महिन्यापासून मोहोर लागला. त्यांची फळधारणा झाली आहे. दरम्यान, ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे. तसेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हापूस, पायरी व रायवळ झाडांना मोहोर फुटला आहे. दरम्यान, ढगाळ हवामानामुळे मोहोर गळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.