माजी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा प्रयत्न

माजी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा प्रयत्न

भुकूम, ता. ४ : आंदगाव (ता. मुळशी) येथील विद्या विकास मंदिर हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित केला होता. या वेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी वर्षभर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी सीआयडी विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजयसिंह येनपुरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, म्हसोबा देवस्थानाचे अध्यक्षा मधुरा भेलके, संस्थेचे सचिव सतीश दरेकर, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र, सरपंच प्रफुल्ल मारणे, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुनील मारणे, सचिव अशोक मेमाणे, प्रवीण मारणे, पदाधिकारी संजय खासनीस, दत्तात्रेय मारणे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण मारणे, दत्तात्रेय उभे, बाळासाहेब मोगल, संजय मारणे उपस्थित होते. या वेळी येनपुरे यांचा उच्च पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मुठा खोरेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या वेळी विद्यार्थी संघाच्यावतीने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांसाठी विशेष व्याख्याने आयोजित करणे, विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, विनाअनुदानित शिक्षकांना मानधनासाठी सहकार्य करणे, दहावी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, एमपीएससी व युपीएससी परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, आदर्श विद्यार्थी पुरस्कार देणे, इंग्रजी विषय व संगणक प्रशिक्षण देणे, संस्कार वर्ग सुरू करण्याचे माजी विद्यार्थ्यांनी निर्णय घेतले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com