मुळशी तालुक्यात आज कृषी साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशी तालुक्यात आज 
कृषी साहित्य संमेलन
मुळशी तालुक्यात आज कृषी साहित्य संमेलन

मुळशी तालुक्यात आज कृषी साहित्य संमेलन

sakal_logo
By

भुकूम, ता. १३ : मुळशी तालुका शेतकरी संघ व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांच्यावतीने रविवारी (ता. १४) घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे कृषी साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
या संमेलनाचे उद्‍घाटन खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते होणार आहे. समारोप कृषी परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते यांच्या हस्ते होईल. सुंदरबन कार्यालयात हे साहित्य संमेलन होणार आहे. सकाळी नऊ वाजता शेतकऱ्यांची कृषी व ग्रंथ दिंडी निघणार आहे. संमेलनाच्या ठिकाणी शासनाच्यावतीने जनावरांसाठी मोफत चारा बियाणे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, आधुनिक यंत्र सामग्री, सेंद्रिय खते, बियाणे, ठिबक सिंचन, मोटर स्टार्टर, केशर आंबा लागवड माहिती, महाडिबीटीवरून यंत्र सामग्री मिळविण्याची माहिती यांचे स्टॉल राहणार आहेत. बेलावडे येथील कातकरी आदिवासींचे नृत्य राहणार आहे. यावेळी तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे अनुभव शेतकऱ्यांना ऐकण्यास मिळणार आहे. शेती तज्ञांचे व्याख्यान, काव्य वाचन होईल. शासनाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मारणे यांच्या आंदगाव ते अमेरिका या पुस्तकाचे व उपाध्यक्ष भाऊ केदारी यांच्या ‘शेत दलाल’ या काव्य संग्रामाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी केंद्रीय अन्न पुरवठा महामंडळाचे माजी सदस्य शांताराम जांभूळकर व स्वागताध्यक्ष तात्यासाहेब देवकर यांची निवड केली आहे.