खासदारांपुढे वाचला समस्यांचा पाढा

खासदारांपुढे वाचला समस्यांचा पाढा

भुकूम, ता. १६ : मुळशी तालुक्यातील भूगाव, बावधन, भुकूम, लवळे ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढे गावातील समस्या मांडल्या. पाणी पुरवठा, खंडित वीज पुरवठा, वाहतूक कोंडी आदी प्रश्‍न प्रामुख्याने यावेळी ग्रामस्थांकडून मांडण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने भुकूम, भूगाव, बावधन, सूस गावातील कार्यकर्त्यांची आढावा भुकूम (ता. मुळशी) येथे आयोजित केली होती. यावेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, विद्युत वितरण कंपनीचे संचालक प्रवीण शिंदे, सविता दगडे, महादेव कोंढरे, राजेंद्र हगवणे, दगडूकाका करंजावणे, सागर साखरे, दीपाली कोकरे, नामदेव माझीरे आदी उपस्थित होते
यावेळी बावधनचे प्रश्न दीपक दगडे, अभिजित दगडे व विशाल खिलारे यांनी मांडले. येथे झालेल्या मोठ्या सोसायट्यांनी भेटी द्याव्यात, कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, सोसायट्यांना भरपूर, पण गावठाणात पिण्यास पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. जितेंद्र इंगवले यांनी भूगाव येथे सहा बूथ आहेत व त्याचे नियोजन झाल्याचे सांगितले. बाह्यवळणाचा रस्त्याच्या शेतकऱ्यांना मोबदला देऊन करण्याची कार्यवाही करावी. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असे सांगितले. अजित इंगवले, बाळासाहेब शेडगे, अक्षय सातपुते यांनी वीज व कचऱ्याचा प्रश्न मांडला. भुकूम येथे अनधिकृत इमारतीत फ्लॅट घेतलेल्यांचे अधिकृत करावे, सोसायट्यांचा सेल निर्माण करावा, अशी मागणी आकाश आंग्रे यांनी केली. तसेच ड्रेनेज व लाईटचा प्रश्न सोडवावा, मुळशी प्रादेशिकचे पाणी मिळावे, अशी मागणी माजी सरपंच गौरी भरतवंश, सरपंच मयूरी आमले यांनी केली. लवळे येथे पिण्याचे पाणी मिळत नाही. तसेच, कचऱ्यासाठी घंटा गाडी सुरू करावी, अशी मागणी सारिका शिंदे यांनी केली. बोगस मतदारांची नावे कमी करावे, मतदान कार्ड पोहोच झाली नाहीत, अशी मागणी विशाल खिलारी यांनी केली.
दरम्यान, भूगाव-भुकूमचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नविन सबस्टेशनसाठी शेती महामंडळाची जागा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही गावांचा प्रश्न सुटेल, असे विद्युत वितरण कंपनीचे संचालक प्रवीण शिंदे यांनी सांगितले.

मुलींना वाचविणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान
खडकवासला धरणात बुडत असलेल्या सात मुलींना वाचविल्याबद्दल शेतकरी संजय माताळे, राजेंद्र जोरी, सचिन काळोखे, शिवाजी मातेळे, कालिदास माताळे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका झिने यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. यावेळी उरवडे येथील नरेंद्र मारणे व पौड येथील सुनील ढगे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com