Sun, October 1, 2023

पिंपोळी ग्रामपंचायत सदस्यपदी मंदा शेळके
पिंपोळी ग्रामपंचायत सदस्यपदी मंदा शेळके
Published on : 20 May 2023, 2:25 am
भुकूम, ता. २० : पिंपोळी (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत सदस्यपदी मंदा शेळके विजयी झाल्या. त्यांनी सदाशिव शेळके यांचा सदोतीस मतांनी पराभव केला. यापूर्वीचे सदस्य नवनाथ शेळके यांनी निवडणुकीचा हिशोब दिला नसल्यामुळे पद रिक्त झाले होते. माजी सरपंच बाबाजी शेळके यांच्या पत्नी आहेत. माजी सभापती पांडुरंग ओझरकर, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर यांनी त्यांचे अभिनंदन केले.