पर्यटकांच्या आकर्षणाचे मुठा खिंड बनले केंद्र
भुकूम, ता. २० : मुळशी तालुक्यातील मुठा खिंड पर्यटकांचे आकर्षण झाले आहे. येथील उंच डोंगर, त्यावरून वाहणारे ओहळांचे पाणी, निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या लक्ष वेधून घेत आहे. सध्या येथे पर्यटकांची गर्दी होत आहे.
मुळशी तालुक्यात लवासा रस्त्यावर मुठा खिंड आहे. येथील नागमोडी वळणे, उंच डोंगर दरे, झाडी, जंगल पर्यटकांना आनंद देतात. तसेच संपूर्ण दिसणारे मुठा खोरे विलोभनीय दिसते. डोंगराच्या पायथ्या पासून वळसे घेत वाहणारी मुठा नदी पर्यटकांचे आकर्षण ठरते. सध्या शनिवार व रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी खिंडीत असते. वळणावर ठिकठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेतात. त्यामुळे स्थानिकांनी छोटी हॉटेल, मक्याची कणसे याचा व्यवसाय सुरू केला आहेत. याभागात टेमघर धरण, लवासा, म्हस्वेश्वर मंदिर येथे पर्यटक भेटी देतात. सध्या रिमझिम पाऊस तर कधी कोवळे ऊन याचा आनंद पर्यटकांना मिळत आहे.