इंदापूर तालुक्यात प्राण्यांसाठी पाण्याची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर तालुक्यात प्राण्यांसाठी पाण्याची सोय
इंदापूर तालुक्यात प्राण्यांसाठी पाण्याची सोय

इंदापूर तालुक्यात प्राण्यांसाठी पाण्याची सोय

sakal_logo
By

भिगवण, ता. १२ : इंदापूर तालुक्यातील अकोले, भादलवाडी, पोंधवडी परिसरातील कृत्रीम पाणवठ्यांमध्ये रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. रोटरी क्लबच्या वतीने कृत्रीम पाणवठे भरल्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांना दिलासा मिळाला आहे. रोटरीच्या या उपक्रमाचे पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होत आहे.
इंदापूर तालुक्यातील अकोले, भादलवाडी, पोंधवडी परिसरामध्ये चिंकारा, हरिण, ससे, लांडगे, कोल्हे आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे या भागातील नैसर्गिक पाणीसाठे कोरडे पडले होते. वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत होते. यातून काही वेळा मानव प्राणी संघर्ष तर कधी रस्ते अपघात अशा घटना घडत होत्या. काही वेळा पाण्याअभावी वन्यप्राण्यांचे हाल होत असल्याचे चित्र होते. वन्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती विचारात घेऊन येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने अकोले, भादलवाडी, पोंधवडी परिसरातील वन्य प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे टॅंकरच्या माध्यमातून भरण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष संजय खाडे, सचिन बोगावत, रियाज शेख, संपत बंडगर, औदुंबर हुलगे, प्रदीप ताटे, संतोष सवाने, डॉ. अमोल खानावरे, बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते. वन विभागातील अधिकारी संध्या कांबळे व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील कृत्रिम पाणवठे भरण्यात आले.

इंदापूर तालुक्यातील अकोले, भादलवाडी, पोंधवडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक साठे संपले होते. त्यामुळे वन्य प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत होते. रोटरी क्लबच्या वतीने परिसरातील कृत्रिम साठे पाण्याने भरून वन्य प्राण्यांना दिलासा देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.
संजय खाडे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ भिगवण

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00068 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top