हायवाच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हायवाच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
हायवाच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू

हायवाच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

भिगवण, ता. १३ ः वीटभट्टीसाठी माती वाहतूक करणाऱ्या हायवाच्या मागच्या चाकाखाली सापडून येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ज्ञानेश्वर राजेंद्र बिबे (वय २७ वर्षे, रा . विवेकानंदनगर, भिगवण, ता. इंदापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण - राशीन रोड लगत असलेल्या वीटभट्टीसाठी हायवातून माती टाकण्याचे काम चालू होते. ज्ञानेश्वर राजेंद्र बिबे याच्या अंगावरून हायवाचे पाठीमागील चाक गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस हवालदार लोढी हे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00070 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top