तक्रारवाडी सोसायटीवर भाजपचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तक्रारवाडी सोसायटीवर भाजपचे वर्चस्व
तक्रारवाडी सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

तक्रारवाडी सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

sakal_logo
By

भिगवण, ता. १३ ः तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील तक्रारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध निवडून आलेले संचालक भाजपप्रणित राजवर्धनी सहकार पॅनेलचे उमेदवार असल्यामुळे सोसायटीवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तक्रारवाडी गावांमध्ये सत्तांतर झाले होते. त्यामुळे तक्रारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोसायटीच्या तेरा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर अमर भगवान धवडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित बारा जागांसाठी राजवर्धनी सहकार पॅनेल व विरोधी पॅनेलकडून ३३ अर्ज दाखल झाले होते. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी पॅनेलमधील सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राजवर्धनी सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. विजयी राजवर्धनी सहकार पॅनेलचे नेतृत्व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत वाघ व प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती सुनील वाघ यांनी केले.
बिनविरोध निवड झालेले नूतन संचालक ः यशवंत मुकुंदराव वाघ, अर्जुन मारुती जराड, युवराज उत्तम काळंगे, अनिल रामचंद्र वाघ, अमोल अशोक वाघ, रामचंद्र प्रकाश वाघ, अविराज विठ्ठल वाघ, वैभव बाळासाहेब जाधव, शेखलाल करीम मुलाणी, रामचंद्र बापूराव जगताप, अमरनाथ भगवान धवडे, मीना रमेश वांझखडे, चैत्राली अतुल वाघ.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00071 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top